मुंबई, दि. 24 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित दिलखुलास कार्यक्रमात मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांची मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत शुक्रवार दि. 25 आणि शनिवार दि. 26 मे 2018 रोजी आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवरून सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदक युवराज मोहिते यांनी ही मुलाखत घेतली आहे.
राज्याला 720 किमीचा विस्तीर्ण समुद्र किनारा लाभला असल्याने राज्यात मत्स्यव्यवसायाला विशेष महत्व आहे. देशात सागरी मासेमारीत महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक आहे. मत्स्य विभागांतर्गत राबविण्यात येणारा ‘तलाव तेथे मासळी’ हा उपक्रम, मत्स्यविकास धोरण व त्यातील अडचणी, मत्स्यविकास विभागाच्या नाविन्यपूर्ण योजना, मत्स्य बाजार स्वच्छ ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न, राज्यातील सागरी मासेमारीला चालना देण्यासाठी राबविण्यात येणारे विविध उपक्रम, मत्स्य व्यवसायातील महिलांचे योगदान लक्षात घेऊन महिलांसाठी राबविण्यात आलेल्या कल्याणकारी योजना याबाबतची माहिती श्री. जानकर यांनी दिलखुलास कार्यक्रमातून दिली आहे.
००००

No comments:
Post a Comment