Thursday, 24 May 2018

नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी 30 मे रोजी प्रारूप मतदार याद्या


मुंबईदि. 24 : राज्यातील विविध 6 नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक आणि 12 नगरपरिषदा व नगरपंचायतीतील 13 रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या 30 मे 2018 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहेतअशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे दिली.
श्री. सहारिया यांनी सांगितले कीया निवडणुकांकरिता विधानसभा मतदारसंघाच्या 21 मे 2018 रोजी अस्तित्वात असलेल्या मतदार याद्या ग्राह्य धरण्यात येणार आहेत. त्याआधारावर तयार करण्यात येणाऱ्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या संबंधित ठिकाणी 30 मे 2018 रोजी प्रसिद्ध केल्या जातील. तेव्हापासून त्यावर 4 जून 2018 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या 7 जून 2018 रोजी प्रसिद्ध केल्या जातील. मतदान केंद्रांची यादी 11 जून 2018 रोजीतर मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या 13 जून 2018 रोजी प्रसिद्ध केल्या जातील. यात राजापूर (जि. रत्नागिरी) नगरपरिषदेच्या अध्यक्षपदाच्या पोट निवडणुकीचा आणि शेगाव (जि. बुलडाणा) नगरपरिषदेच्या हद्दवाढ क्षेत्रासाठीच्या निवडणुकीचाही समावेश आहे.
प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करताना विधानसभा मतदारसंघाच्या यादीप्रमाणेच प्रभागनिहाय मतदार याद्यांमध्ये मतदारांची नावे व पत्ते कायम ठेवले जातात. या याद्यांमध्ये नवीन नावांचा समावेश करणेनावे वगळणे अथवा नावे किंवा पत्त्यांमध्ये दुरूस्ती करणे इत्यादी स्वरूपाची कार्यवाही राज्य निवडणूक आयोगाकडून केली जात नाही. हरकती व सूचनांच्या अनुषंगाने केवळ मतदार याद्यांचे विभाजन करताना लेखनिकांकडून होणाऱ्या चुकामतदाराचा चुकून प्रभाग बदलणेविधानसभेच्या यादीत नाव असूनही प्रभागाच्या यादीत नाव नसणे आदींसंदर्भातील दुरूस्त्या करण्यात येतातअशीही माहिती श्री. सहारिया यांनी दिली.
सार्वत्रिक निवडणूक होणाऱ्या नगरपरिषदा/ नगरपंचायती: भोर (जि. पुणे)वडगाव (जि. पुणे)मुक्ताईनगर (जि. जळगाव)बार्शीटाकळी (जि. अकोला),वानाडोंगरी (जि. नागपूर)पारशिवनी (जि. नागपूर) आणि शेगाव (जि. बुलडाणा) हद्दवाढ क्षेत्रासाठी.
पोटनिवडणुकीसाठी मतदान होणाऱ्या रिक्त पदांचा नगरपरिषदा/ नगरपंचायतनिहाय तपशील: राजापूर (जि. रत्नागिरी)- अध्यक्षजव्हार (जि. पालघर)- 6 बपोलादपूर (जि. रायगड)- 16पंढरपूर (जि. सोलापूर)- 10 बवाई (जि. सातारा)- 5 अमेढा (जि. सातारा)- 15निफाड (जि. नाशिक)- 6श्रीरामपूर (जि. अहमदनगर)- 12 अश्रीगोंदा (जि. अहमदनगर)- 2 ब आणि 3 कनंदुरबार (जि. नंदुरबार)- 16 अलोहारा बु. (जि. उस्मानाबाद)- 2 आणि मोहाडी (जि. भंडारा)- 12.
०-०-०

No comments:

Post a Comment