नागपूर, दि.23 : पश्चिम पेंच परिक्षेत्रातील कोलीतमारा बिट कक्ष क्रमांक 668 मध्ये दिनांक 20 मे रोजी, दुपारी 5 वाजता एक वाघ छावा (मादी) मृतावस्थेत आढळून आली. हा वाघ छावा (मादी) दुसऱ्या मोठया वाघाकडून मारल्या गेल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले असल्याचा खुलासा क्षेत्रसंचालक आर.एस. गोवेकर यांनी सादर केले आहे.
मृत वाघाच्या मानेवर, नाकावर, पुढील पायावर खोल जखमा तसेच समोरच्या शरीराच्या बाजूच्या भागावर सुध्दा काही जखमा दिसून आल्या. घटनास्थळापासून जवळच मोठया वाघाच्या अस्तित्वाच्या पाऊलखुणा आढळल्या असून सदर वाघ छावा (मादी) चे सर्व अवयव शाबुत आढळले आहेत. घटनास्थळी वनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालक, पंचे व्याघ्र प्रकल्प उपस्थित होते. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण नवी दिल्लीचे वैभव सी. माथूर हे सायंकाळी 6.15 वाजता घटनास्थळी पोहचले. त्यांचे उपस्थितीत राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण यांचे प्रचलीत प्रमाणभूत पध्दतीप्रमाणे (एसओपी) कार्यवाही करण्यात आली आहे.
मृत वाघ छावा (मादी) चे शवविच्छेदन व अनुषंगीक कार्यवाही दिनांक 21 मे रोजी करण्यात आली. शवविच्छेदनाच्या वेळी पंचनामा करताना राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाचे वैभव सी. माथूर, पेंच व्याघ्र प्रकल्पाचे निनू सोमराज, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. बी.एम. कडू अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) पूर्व नागपूर यांचे कार्यालय, पशुधन विकास अधिकारी डॉ. के.एस. लोखंडे, डॉ. सी.जी. हगोने, वाईल्ड लाईफ ट्रस्ट ऑफ इंडिया-मुख्य वन्यजीव रक्षक यांचे प्रतिनिधी प्रफुल्ल भांबुरकर, ट्रॉझिट ट्रिटमेंट सेंटरचे डॉ. बिलाल अली हे उपस्थित होते.
शवविच्छेदनानंतर या छाव्याचा मृत्यू हा मोठया वाघाशी, वाघीणीशी झालेल्या झटापटीत झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मृत वाघा (मादी) हा पेंच व्याघ्र प्रकल्पातील टीएफ 3 वाघीणीचा छावा असल्याचे निष्पन्न झाले व त्याचे वय अंदाजे एक वर्षाच्या आत होते. पीटीआर टीएफ 3 या वाघीणीच्या दिनांक 24 फेब्रुवारी रोजीच्या मृत्यूनंतर क्षेत्रीय संनियंत्रणाद्वारे तसेच वाईल्ड लाईफ कंझरवेशन ट्रस्ट कडून दिनांक 1 मार्च रोजी प्राप्त कॅमेरा ट्रॅप फोटोच्या वरुन सदर मादी सोबत मागील एक महिन्यापासून व त्यानंतर सुध्दा एक छावा (सी-2) वावरत असल्याचे दिसले होते व त्याअनुषंगाने राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण यांचे प्रचलीत प्रमाणभूत पध्दती (एसओपी) मध्ये नमूद केल्यानुसार दिनांक 2 मार्च रोजी एक सनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली. त्यामध्ये वाईल्ड लाईफ ट्रस्ट ऑफ इंडिया-मुख्य वन्यजीव रक्षक यांचे प्रतिनिधी प्रफुल्ल भांबुरकर, डब्ल्यूसीटी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण यांचे प्रतिनिधी आदित्य जोशी, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. व्ही.एम. कडू, सरपंच श्रीमती उषाबाई तुमडाम, माजी पशुवैद्यकीय अधिकारी (वन्यजीव) डॉ. अ.द. खोलकुटे यांचा समावेश आहे.
या सनियंत्रण समितीचे निर्देशानुसार या छाव्याचा कॅमेरा ट्रॅप, बिट, पीआयपी इ. पध्दतीने मागोवा घेण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. यामध्ये एकूण 11 कक्ष क्रमांक मध्ये (पूर्व पेंच/पश्चिम पेंच) सुमारे 26 कॅमेरा ट्रॅप तसेच 30 पीआयपी तयार करुन मागोवा घेणे, पायी गस्त करणे इ. कार्यवाही केली होती. समितीने दिनांक 4 मार्च रोजी प्रथम क्षेत्रीय भेट दिली. त्यानंतर पुन्हा 13 मार्च रोजी क्षेत्रीय भेट देऊन सनियंत्रण कामाची तपासणी केली. दिर्घ प्रयत्नानंतर सदर छावा केवळ एक वेळ कॅमेरा ट्रॅपमध्ये आला होता. दिनांक 20 मे रोजी या छाव्याचा दुसऱ्या वाघासोबत झटापटीत मृत्यू झाला आहे. पेंच व्याघ्र प्रकल्पात माहे जानेवारी 2018 पासून आतापर्यंत एक वाघीण व दोन छावे यांच्या मृत्यूच्या घटना नोंदविण्यात आलेल्या असल्याचा खुलासा वनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालक आर.एस. गोवेकर यांनी केला आहे.
00000000
No comments:
Post a Comment