नागपूर, दि.23 : सहकार विभागामार्फत घेण्यात येत असलेल्या जीडीसी अॅण्ड ए व सीएचएम ही परीक्षा शनिवार, दिनांक 26 ते 28 मे पर्यंत सक्करदरा चौक येथील विदर्भ बुनियाद हॉयस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे घेण्यात येणार आहे. परीक्षेचे प्रवेशपत्र ऑनलाईन पाठविण्यात आले असून ज्यांना प्रवेशपत्र अद्याप मिळाले नाही त्यांनी स्वत:चे अथवा पॅनकार्ड, मतदान कार्ड, आधार कार्ड, कॉलेजचे ओळखपत्र सादर केल्यास परीक्षेला बसता येईल, असे जिल्हा उपनिबंधक एस. एल. भोसले यांनी कळविले आहे.
00000000
No comments:
Post a Comment