नागपूर दि.7 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्या वतीने घेण्यात येणाऱ्या माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी/मार्च 2018चा निकाल शुक्रवार, दिनांक 8 जून रोजी दुपारी 1 वाजता मंडळाच्या संकेत स्थळावरून ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात येणार आहे.
मंडळाचे संकेत स्थळ www.mahresult.nic.in, www. sscresult.mkcl.org, www.maharashtraeducation.com जाहीर करण्यात येणार आहे. तसेच याशिवाय बीएसएनएल ग्राहक 57766 या क्रमांकावर MHHSC<space><seat no> टाकून एसएमएसद्वारे देखील परीक्षेचा निकाल प्राप्त करू शकतात.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ नागपूरच्यावतीने विद्यार्थी व पालक कार्यालय दूरध्वनी क्रमांक 0712-2565403, 2553401यावर संपर्क साधू शकतील. समुपदेशनासाठी विशाल गोस्वामी 8275039252, 9371168840, पी. के. शेकार 9766917338, गायत्री भुसारी 9011062355, मिलींद रंगारी 9404860735, सतिश पाटील 9421914353, आणि डी. एम. जवंजाळ 9421817089 हे अधिकारी व भ्रमणध्वनी समुदपदेशनासाठी उपलब्ध करण्यात आले आहेत. निकाल जाहीर झाल्यापासून गुणपत्रिका वितरणाच्या दिनांकापर्यत मंडळाची हेल्पलाईन सेवा सुरु राहील. यामध्ये अशी माहिती मंडळाचे विभागीय सचिव यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
*****
No comments:
Post a Comment