Thursday, 7 June 2018

नागपूर विभागाच्या खरीप हंगाम नियोजनाची आढावा बैठक आज


 नागपूर दि.07 : कृषी व फलोत्पादनपणन आणि पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या शुक्रवारदिनांक जून रोजी सकाळी 11 वाजता विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभाकक्षात खरीप हंगामाच्या नियोजनाबाबत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
नागपूर विभागांतर्गत सर्व जिल्ह्याचे खरीप हंगामाचे नियोजन व कृषी विभागाच्या विविध योजनांबाबत यावेळी जिल्हानिहाय आढावा घेण्यात येणार आहे. बैठकीला विभागीय आयुक्त अनूप कुमार यांच्यासह नागपूर विभागातील सर्व जिल्ह्याचे जिल्हाधिकारीकृषी अधिकारी व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित राहतील.
***** 

No comments:

Post a Comment