मुंबई, दि. 4 : न्यायाधीन बंदी आयुब ईनायतअली जाफरी (क्र.01/1787) यांच्या मृत्यू प्रकरणाची दंडाधिकारी चौकशी शुक्रवार दि. 15 जून 2018 रोजी होणार आहे. यासंबंधी लेखी म्हणणे मांडण्याचे आवाहन नायब तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी, मुंबई शहर यांनी केले आहे.
न्यायाधीन बंदी आयुब जाफरी यांचे सर जे. जे. रुग्णालयात वैद्यकीय उपचार घेत असताना 29 जाने 2018 रोजी मृत्यू झाला होता. या घटनेची दंडाधिकारी चौकशी दि. 15 जून रोजी दुपारी 2 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, निवडणूक शाखा, तिसरा मजला, जुने जकातघर, शहीद भगतसिंग मार्ग, फोर्ट, मुंबई -01 या ठिकाणी होणार आहे.
0 0 0
No comments:
Post a Comment