मुंबई, दि. 4 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित 'जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात पर्यावरण मंत्री रामदास कदम यांची "पर्यावरण रक्षणासाठी प्लास्टिक मुक्ती" या विषयावर विशेष मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून मंगळवार दिनांक 5 जून रोजी संध्याकाळी 7.30 ते 8 या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदक संजय भुस्कुटे यांनी ही मुलाखत घेतली आहे.
5 जून हा जागतिक पर्यावरण दिन आहे. यंदाच्या जागतिक पर्यावरण दिनाची विश्व संकल्पना 'प्लास्टिक प्रदूषण टाळा' अशी आहे तसेच "पर्यावरण रक्षणासाठी प्लास्टिक मुक्ती" ही संकल्पना पर्यावरण विभागाद्वारे राबविण्यात येत आहे. प्लास्टिक व थर्मोकोल बंदीबाबत राज्यशासनाने जाहीर केलेले धोरण,प्लास्टिकचे पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम, प्लास्टिक बंदीची आवश्यकता का भासली, प्लास्टिक बंदी धोरणाची पूर्वतयारी, इतर राज्यातील प्लास्टिक बंदी निर्णयाचा अभ्यास व निष्कर्ष, प्लास्टिक बंदी धोरणाच्या अंमलबजावणीसाठी करण्यात आलेल्या उपाययोजना व नागरिकांचा सहभाग या विषयांची माहिती श्री.कदम यांनी 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमातून दिली आहे.
0 0 0

No comments:
Post a Comment