Saturday, 2 June 2018

मुद्रांक उद्दिष्टे पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार



 नागपूर, दि. 2 : सन 2017-18 मधील  नोंदणी उपनिरीक्षक व मुद्रांक उपनियंत्रण विभागाच्या नागपूर विभागाने 1 हजार 60 कोटीचे उद्दिष्ट  पूर्ण करणाऱ्या  कर्मचाऱ्यांचा सत्कार जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्या हस्ते नुकताच करण्यात आला.
            यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रकाश पाटील तसेच नोंदणी उपमहानिरिक्षक व मुद्रांक उपनियंत्रण नागपूर विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
            नागपूर विभागाने 1 हजार 131 कोटी 63 लाख  कोटीचा महसूल उद्दिष्ट  साध्य केले. यात जिल्हा निबंधक नागपूर शहर यांना 663 कोटीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी त्यांनी 740.43 टक्के उद्दिष्ट साध्य केले तर जिल्हा निबंधक नागपूर ग्रामीण त्यांनी 176.21 टक्के उद्दिष्ट साध्य केले. जिल्हा निबंधक गोंदिया यांना 21 कोटी देण्यात आले. जिल्हा निबंधक वर्धा यांना 71 कोटी देण्यात आले होते त्यापैकी 75.79 टक्के उद्दिष्ट साध्य केले. जिल्हा निबंधक गडचिरोली यांना 10 कोटी रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले होते त्यापैकी त्यांनी 10.61  टक्के उद्दिष्ट साध्य करणाऱ्या  कर्मचाऱ्यांचा प्रमाणपत्र देवून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन आर.जी. राऊत यांनी केले.
*****

No comments:

Post a Comment