Saturday, 2 June 2018

विज्ञानविषयक शिक्षकांनी 31 जुलैपर्यत पॅनल फॉर्म सादर करा



                नागपूर दि.02 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे अंतर्गत फेब्रुवारी/मार्च 2019 ची माध्यमिक प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेकरिता विज्ञान व तंत्रज्ञान (72) शिक्षकांचे सेवाजेष्ठतेनुसार दिनांक 31 जुलैपर्यंत पॅनल फॉर्म नागपूर विभागीय मंडळ कार्यालयात सादर करण्याचे आवाहन मंडळाचे विभागीय सचिव रविकांत देशपांडे यांनी संबंधित शाळांना केले आहे.
            पॅनल फॉर्म विभागीय मंडळाच्या www.nagpureduboard.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे. शाळांना विज्ञान व तंत्रज्ञान विषयाच्या सर्व शिक्षकांची माहिती पॅनल फॉर्म मध्ये सादर करणे आवश्यक आहे. प्राप्त पॅनल फॉर्मनुसार फेब्रुवारी/मार्च 2019 रोजी होणाऱ्या माध्यमिक प्रात्यक्षिक परीक्षेकरिता अंतर्गत व बहिर्गत परीक्षकांची नेमणूक करण्यात येईल. यादीत विज्ञान व तंत्रज्ञान विषयाच्या कुठल्याही शिक्षकाची नावे सुटल्यास किंवा त्यासंबंधी तक्रार प्राप्त झाल्यास संबंधित शाळेवर कारवाई करण्यात येईल, असे प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
*****

No comments:

Post a Comment