Saturday, 2 June 2018

भाषा संचालनालयामार्फत करार पध्दतीने नियुक्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन


मुंबई, दि. 2: भाषा संचालनालयामार्फत केंद्रीय अधिनियम आणि राज्य अधिनियम यांच्या सुधारणापरिभाषा कोश निर्मिती या कामासाठी करार पध्दतीने एका वर्षासाठी सहायक संचालक (अनुवाद व शब्दावली) याची नियुक्ती करण्यात येणार आहे. या पदासाठी या पदावरुन सेवानिवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांची करार पध्दतीने नेमणूक करण्यात येणार आहे. या पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन भाषा संचालकांमार्फत करण्यात आले आहे.
या नियुक्तीबाबतच्या अटी व शर्ती तसेच इतर सविस्तर माहितीसाठी भाषा संचालनालयाचे www.maharashtra.gov.in हे संकेतस्थळ पहावे तसेच इच्छुकांनी आपले अर्ज भाषा संचालनालयनवीन प्रशासन इमारत, 5 वा मजलावांद्रे (पूर्व)मुंबई 400051 या पत्त्यावर 30 पूर्वी पाठवावेत असे आवाहन भाषा संचालक हर्षवर्धन जाधव यांनी प्रसिध्दीपत्रकादवारे केले आहे.
००००

No comments:

Post a Comment