Wednesday, 6 June 2018

लोकराज्य मासिकाच्या पर्यावरण विशेषांकाचे रामदास कदम यांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई, दि. 6 : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्र शासनाचे मुखपत्र असलेल्या लोकराज्य मासिकाच्या मराठी, हिंदी आणि गुजराती भाषेतील पर्यावरण विशेषांकाचे प्रकाशन पर्यावरण मंत्री रामदास कदम आणि राज्यमंत्री प्रविण पोटे-पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. हा कार्यक्रम यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये पार पडला.
प्रकाशित करण्यात आलेल्या लोकराज्यच्या पर्यावरणाचे संरक्षण-वसुंधरेचे रक्षण’ या पर्यावरण विशेषांकात पर्यावरण रक्ष्‍ाणासाठी प्लास्टिकमुक्ती’,ग्लोबल वॉर्मिंगखारफुटी नसेल तर?, ग्लोबल वॉर्मिंग आणि शहरीकरणप्लास्टिकमुक्त पर्यावरणआपली जैवविविधताजलसंपदेचे संवर्धननदीखोऱ्यांचे संतुलनदुष्काळाशी सामना करणारी जलसंवर्धन पंचायतजीवघेणे ध्वनिप्रदूषणआवाजाचा फटका सागरी जलचरांनापावसाचे वेळापत्रक का बदललेआदी तज्ज्ञ लेखकांनी लिहीलेल्या लेखांचा यात समावेश करण्यात आला आहे. या मासिकाची किंमत १० रूपये आहे. हा अंक सर्वत्र उपलब्ध आहे.
यावेळी या प्रकाशन समारंभास संपादक सुरेश वांदिले, वरिष्ठ सहायक संचालक डॉ. संभाजी खराट, वरिष्ठ सहायक संचालक मीनल जोगळेकर, उपसंपादक राजाराम देवकर, गजानन पाटील उपस्थित होते.
००००

No comments:

Post a Comment