नागपूर दि.06 :केंद्र सरकार पुरस्कृत योजनेंतर्गत संत कबीर पुरस्कार, राष्ट्रीय पुरस्कार व राष्ट्रीय उत्कृष्टता प्रमाणपत्र 2017 करीता राज्यातील कुशल व पात्र विणकरांनी‘विणकर सेवा केंद्र’ नागपूरकडे दिनांक 16 जुलैपर्यत अर्ज सादर करावे.
केंद्र शासनाच्या वस्त्र मंत्रालय अंतर्गत विका आयुक्त कार्यालयाच्या वतीने सन 2017 चे संत कबीर पुरस्कार, राष्ट्रीय पुरस्कार व राष्ट्रीय उत्कृष्टता प्रमाणपत्र पुरस्कार बहाल करण्यात येत आहेत. याकरिता अर्हता पात्र विणकरांना हाताने विणलेल्या नमुने तसेच आवश्यक कागदपत्रासह दिनांक 16 जुलैपर्यत अर्ज सादर करण्यास अवधी देण्यात आला आहे. या कालावधी संत कबीर पुरस्कारांतर्गत विणकर श्रेणीत 10 सामान्य तसेच 2 महिला विणकरांना ‘कमलादेवी चट्टोपाध्याय पुरस्कार’ देण्यात येईल. राष्ट्रीय पुरस्कारांतर्गत विणकर श्रेणीत 20 सामान्य व 4 महिला विणकरांना, हातमाग उत्पादनाच्या संवर्धनाकरिता डिझाईन विकास श्रेणीत 3, हातमाग उत्पादनांचे विपणन श्रेणीत 5 सामान्य तसेच 5 महिला विणकरांना देण्यात येणार आहे. राष्ट्रीय उत्कृष्टता प्रमाणपत्रांतर्गत विणकर श्रेणीत 20 सामान्य तसेच 4 महिला विणकरांना, हातमाग उत्पादनाच्या संवर्धनाकरिता डिझाईन विकास श्रेणीत 6, हातमाग उत्पादनांचे विपणन श्रेणीत 10 सामान्य अशा प्रकारे एकूण 84 पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.
पुरस्काराची पात्रता, वय, अनुभव संबंधीची माहिती विकास आयुक्त (हातमाग) कार्यालयाच्या संकेतस्थळावर (www.handlooms.nic.in) देण्यात आली आहे. अर्ज नमुना तसेच अधिक माहितीकरिता इच्छुक क्षेत्रातील विणकर सेवा केंद्राशी संपर्क साधू शकतात, असे वस्त्रोद्योग नागपूर कार्यालयाचे प्रादेशिक उपसंचालक यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
*****
No comments:
Post a Comment