नागपूर दि.07 : खरीप हंगामामध्ये
प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी दिनांक 31 जुलैपर्यंत सहभागी होण्याचे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक
यांनी केले आहे.
खरीप हंगाम 2018 करीता लागू प्रधानमंत्री
पीक विमा योजना कर्जदार शेतकऱ्यांसाठी अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकासाठी
तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक स्वरुपात लागू आहे. शेतकऱ्यांना खरीप
हंगामातील पिकासाठी 2 टक्के , नगदी
पिकासाठी 5 टक्के हप्ता जमा करावा लागेल. सर्व पिकांसाठी
जोखिमस्तर 70 टक्के निश्चित करण्यात आला आहे.
नागपूर विभागात प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत दोन कंपन्यांची नियुक्ती
करण्यात आली आहे. वर्धा, भंडारा, गोंदिया जिल्ह्यात इफको टोकीओ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड तसेच नागपूर,
चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात आयसीआयसीआय लौंबार्ड जनरल इन्शुरन्स
कंपनी लिमीटेडच्या सहकार्याने शेतकरी अर्ज सादर करू शकतील. बिगर कर्जदार शेतकरी
दिनांक 24 जुलै तसेच कर्जदार शेतकरी दिनांक 31 जुलैपर्यंत अर्ज सादर करु शकतील.
जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेत सहभागी होण्याचे आवाहन विभागीय कृषी
सहसंचालक यांनी केले आहे.
*****
No comments:
Post a Comment