नागपूर दि.07 : नागपूर
जिल्ह्यातील मौदा तालुक्यात तिसऱ्या सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले
असून यामध्ये सहभागी होण्यासाठी 15 दिवसांपूर्वी
तक्रारी सादर करण्याचे आवाहन उपविभागीय अधिकारी अविनाश कातडे यांनी केले आहे.
विभागीय तसेच जिल्हास्तरीय लोकशाही दिनानंतर आता तालुका स्तरावर देखील लोकशाही
दिनाचे आयोजन करण्यात येणार आहे. प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी
तालुकास्तरीय लोकशाही दिन साजरा करण्यात येईल. मौदा तालुक्यात उपविभागीय अधिकारी
यांच्या अध्यक्षतेखाली लोकशाही दिन घेण्यात येणार आहे. याकरिता तक्रारी नोंदवू
इच्छिणाऱ्यांनी 15 दिवसांपूर्वी 2 प्रतीत मौदा तालुका तहसीलदाराकडे अर्ज सादर करण्याचे आवाहन उपविभागीय
अधिकारी अविनाश कातडे यांनी केले आहे.
*****
No comments:
Post a Comment