* वडसा तालुक्यात सर्वाधिक 70 मिमी अतिवृष्टी
नागपूर दि.27 : नागपूर विभागात गेल्या चोवीस तासात
सरासरी 12.15 मिलीमीटर
पावसाची नोंद झाली असून गडचिरोली जिल्ह्यातील वडसा तालुक्यात 70 मि.मी. इतकी अतिवृष्टी झाली आहे.
विभागात
आज सकाळपर्यंत नोंदला गेलेला जिल्हानिहाय सरासरी पाऊस पुढीलप्रमाणे असून कंसातील
आकडेवारी 1 जूनपासून आजवर झालेल्या पावसाची आहे.
गडचिरोली 23.63 (1174.27), चंद्रपूर 15.23 (953.10), भंडारा 14.40 (898.00), गोंदिया 13.62
(853.14), वर्धा 3.46 (581.86) तर नागपूर
जिल्ह्यात सर्वात कमी 2.56 (853.63) पाऊस पडला आहे. सर्व
आकडेवारी मिलीमीटर परिमाणात आहेत.
नागपूर
विभागात दिनांक 1 जून 2018 ते 27 ऑगस्ट 2018 पर्यत
सरासरी 885.66 मिलीमीटर पाऊस पडला आहे.
*****
No comments:
Post a Comment