मुंबई, दि. 2 : राज्यातील शेतीपिकांवर कीटकनाशकांची फवारणी करणाऱ्या शेतमजूरांच्या नि:शुल्क आरोग्य तपासणीकरीता सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत प्रत्येक जिल्हयातील ग्रामीण रुग्णालयात एक विशेष अभियान राबविण्यात येणार आहे.
कीटकनाशक फवारणी करणाऱ्या सर्व शेतमजूरांनी आरोग्य तपासणी संदर्भात जवळच्या ग्रामीण रुग्णालयात संपर्क साधून आरोग्य तपासणी करुन घ्यावी. या अभियानांतर्गत आरोग्य तपासणी करुन घेणाऱ्या शेतमजूराला आरोग्य तपासणी प्रमाणपत्र देण्यात येईल. या उपक्रमाचा शेतीपिकांवर कीटकनाशकांची फवारणी करणाऱ्या शेतमजूरांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाचे अप्पर मुख्य सचिव विजय कुमार यांनी केले आहे.
००००
No comments:
Post a Comment