मुंबई
दि.6: केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या नागरी सेवा
परीक्षा देणाऱ्यांसाठी राज्य प्रशासकीय व्यवसाय प्रशिक्षण केंद्रामार्फत 11 महिने
पूर्णवेळ विनामूल्य परिक्षा पुर्व प्रशिक्षण देण्यात येणार आहे.या प्रशिक्षणासाठी
प्रवेश मिळविण्याकरिता मुंबई केंद्रामार्फत 4 नोव्हेंबर 2018 रोजी प्रवेश परीक्षा
घेण्यात येणार आहे.
राज्य प्रशासकीय व्यवसाय प्रशिक्षण संस्थेने
जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे ही परीक्षा ऑनलाईन पध्दतीने होणार असून संस्थेमार्फत
www.siac.org.in या संकेतस्थळावर अर्ज मागविण्यात येणार
आहेत.ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी 13 ऑगस्ट 2018 ते 14 सप्टेंबर 2018 असा आहे. प्रवेश
परीक्षा पत्र 23 ऑक्टोबर 2018 ते 4 नोव्हेंबर 2018 या कालावधीत उपलब्ध होणार असून
4 नोव्हेंबर रोजी प्रवेश परीक्षा असेल.
सविस्तर
जाहिरात, परीक्षेचा अभ्यासक्रम, ऑनलाईन अर्ज
भरण्याबाबत माहिती व परीक्षेसंबंधी सर्व सूचना संस्थेच्या www.siac.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचे राज्य प्रशासकीय व्यवसाय प्रशिक्षण
संस्थेच्या मुंबई केंद्राचे संचालक डॉ. म. बा. भिडे यांनी प्रसिध्दीपत्रकादवारे
कळविले आहे.
००००
No comments:
Post a Comment