आंबेनळी
दुर्घटनेत मदतकार्य केलेल्या
गिर्यारोहकांचे कौतुक
मुंबई,
दि. ६ :
अपघातात अडकलेल्यांना सुखरुप बाहेर काढणे आणि अपघातातीलमृतांचे
मृतदेह बाहेर काढून त्यांच्या नातेवाईकांकडे सुपूर्द करण्याचे
काम गिर्यारोहक आपल्या जीवाची बाजी लावून करीत असतात. अशा जिगरबाज गिर्यारोहकांचा
गट विमा असणे ही अत्यंत आवश्यक बाब आहे. येणाऱ्या काळात विविध विमा कंपनीशी चर्चा
करुन गिर्यारोहकांचा गट विमा करण्याला प्राधान्य
देण्यात येईल असे क्रीडा मंत्री विनोद तावडे यांनी आज सांगितले.
मागील
आठवड्यात महाबळेशवर आंबेनळी घाटात बस अपघात झाला
होता. या घाटात जवळपास 500
फूट दरीत बस पडली होती. या बसमधील व्यक्तींचे मृतदेह दरीतून वर काढण्याच्या मदत
कार्यात महाबळेश्वर,
महाड आणि पोलादपूर येथील गिर्यारोहण संस्थांच्या सदस्यांनी
निरपेक्ष आणि कर्तव्य भावनेतून काम केले. आज त्या गिर्यारोहकांचे पुस्तक देऊन
कौतुक क्रीडामंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते मंत्रालयात करण्यात आला. यावेळी
क्रीडा आणि सांस्कृतिक विभागाचे अधिकारी यांच्यासह सह्याद्री
मित्र, यंग
ब्लड ॲडव्हेन्चर्स,महाबळेश्वर
ट्रेकर्स, सहयाद्री
ट्रेकर्स यांच्यासह ट्रेकर्स ग्रुप उपस्थित होते.
श्री.
तावडे यावेळी म्हणाले,
ज्यावेळी अपघात झाल्याचे कळते किंवा आपत्कालीन
परिस्थितीमध्येगिर्यारोहक मदत करायला जातात त्यावेळी सामाजिक जाणीव आणि कर्तव्यातून
समाजात राहणाऱ्या लोकांची मदत करीत असतात. त्यांचे काम आणि त्यांची कर्तव्यभावना
लक्षात घेऊन त्यांचे जीवनही सुरक्षित असणे तितकेच आवश्यक आहे आणि म्हणूनच येणाऱ्या
काळात या गिर्यारोहकांचा गट विमा काढणे याला प्राधान्य देण्यात येईल. यासंदर्भात
विविध विमा कंपन्यांना येथे बोलावून गिर्यारोहकांचा गट
विमा काढावा असे सांगण्यात येईल.
आपत्कालीन
परिस्थितीत जेव्हा हे गिर्यारोहक बचतकार्यासाठी जात असतात तेव्हा त्यांच्य्याकडे
अत्याधुनिक सामुग्री असणे आवश्यक आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात 20
जिल्हयातील गिर्यारोहक ग्रुप यांना क्रीडा विभागामार्फत अत्याधुनिक सामुग्री
देण्याचा प्रयत्न करण्यात येईल. याबरोबरच गिर्यारोहकांना पोलीसांमार्फत ओळखपत्र
दिल्या गेल्यास त्यांना मदत करण्यासाठी जाताना या ओळखपत्राचा फायदा होईल त्यामुळे
याबाबतही पोलीसांबरोबर चर्चा करण्यात येईल.
००००


No comments:
Post a Comment