नागपूर, दि. 02 : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत शासकीय आदिवासी वसतीगृहात प्रवेशाकरिता प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. ऑनलाईन प्रक्रियेंतर्गत इयत्ता 11वी करिता शुक्रवार, दिनांक 10 ऑगस्ट तसेच पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमातील विद्यार्थी शनिवार, दिनांक 25 ऑगस्टपर्यंत अर्ज सादर करु शकतील. विभागाच्या वतीने प्रवेश प्रक्रियेस मुदतवाढ दिल्याने अधिक विद्यार्थ्यांना अर्ज सादर करता येणार आहे. अधिक माहितीकरिता कार्यालयाचे संकेतस्थळ http://swayam.mahaonline.gov. in वर संपर्क साधण्याचे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी डिगांबर चव्हाण यांनी केले आहे.
****
No comments:
Post a Comment