Thursday, 2 August 2018

केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचा नागपूर दौरा


        नागपूरदि. 02 : केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाज बांधणी आणि जलसंधारण, नदी विकास व गंगा पुनरुज्जीवन मंत्री नितीन गडकरी यांचे शुक्रवार, दिनांक 3 ऑगस्ट रोजी दुपारी 4.30 वाजता दिल्ली येथून नागपूर विमानतळावर आगमन. दुपारी 4.45 वाजता रामनगर निवासस्थानी आगमन व राखीव. सायंकाळी 5 वाजता रामनगर निवासस्थानी मनपा परिवहन विभागाची बैठक. स्थानिक कार्यक्रमास उपस्थिती व रात्री मुक्काम.
            शनिवार, दिनांक 4 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता नागपूर येथून विमानाने औरंगाबादकडे प्रयाण. दुपारी 4 वाजता औरंगाबाद येथून नागपूर विमानतळावर आगमन. दुपारी 4.15 वाजता रामनगर निवासस्थानी आगमन व रात्री मुक्काम.
            रविवार, 5 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता अभ्यागतांशी भेटी. सायंकाळी 5 वाजता तुकडोजी चौक येथे तुकडोजी रिजनल कॅन्सर हॉस्पीटल ॲन्ड रिसर्च सेंटरच्या कार्यक्रमास उपस्थिती. सायंकाळी 5.30 वाजता स्थानिक कार्यक्रमास उपस्थिती व रात्री मुक्काम. 
*****

No comments:

Post a Comment