(राष्ट्रपिता
महात्मा गांधीजी यांची १५० वी जयंती
वर्षानिमित्त विशेष कार्यक्रम)
मुंबई,दि.2 :
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित
दिलखुलास कार्यक्रमातराष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांची१५० वी
जयंती वर्षाच्यानिमित्ताने महात्मा
गांधीजींच्या विचारांचे अभ्यासक व लेखक रामदास भटकळ यांची मुलाखत
राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून बुधवार दि. 3 आणि गुरूवार
दि. 4ऑक्टोबर रोजी
सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे. पत्रकारप्रसाद मोकाशी यांनी
ही मुलाखत घेतली आहे.
शासन राष्ट्रपिता
महात्मा गांधीजी यांची १५० वी जयंतीचे वर्ष यंदा साजरे करीत
आहे.या निमित्ताने महात्मा गांधीजींचे अहिंसा, समर्पण व स्वाभिमानाबद्दलचे विचार,महात्मा गांधींजीच्या
स्वप्नातील भारत घडविण्यासाठी व त्यांचे विचार आणि तत्वांचा वारसा पुढे
नेण्यासाठीआपण काय प्रयत्न केले पाहिजे तसेच गांधी आणि कस्तुरबा,द पॉलिटिकल आल्टर्नेटिव्हज
इन इंडिया आणि मोहनमायायाश्री. भटकळ लिखित पुस्तकांबद्दल माहितीहीत्यांनी दिलखुलास कार्यक्रमातून दिली आहे.
0000
No comments:
Post a Comment