* ‘भाव कृतज्ञतेचा-सत्कार मान्यवरांचा’ कार्यक्रम
*
विदर्भ गौरव प्रतिष्ठानचे आयोजन
नागपूर, दि 2 : राष्ट्राच्या जडण-घडणीत अनेकांचे मोठे योगदान लाभले आहे.
अशा व्यक्तीच्या गौरवशाली कार्याची समाजाला ओळख करुन देण्याचा हा प्रयत्न आहे.
समाजातील गौरवशाली कर्तृत्वाचे धनी असणाऱ्या व्यक्तींकडून भावी पिढीला नक्कीच
प्रेरणा मिळेल, असा विश्वास
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.
शंकर नगर
परिसरातील साई सभागृह येथे विदर्भ गौरव प्रतिष्ठानच्या वतीने ‘भाव कृतज्ञतेचा-सत्कार मान्यवरांचा’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
यावेळी उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती
विजय डागा, माजी खासदार
दत्ता मेघे, विदर्भ गौरव प्रतिष्ठानचे प्रमुख गिरीश गांधी,
बाबुराव तिडके तसेच सत्कारमूर्ती उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या
माध्यमातून गौरव होत असलेल्या प्रतिभाशाली व्यक्तींना एक मंचावर आणणे सोपे नव्हते.
समाजात विविध विषयांवर उल्लेखनीय कार्य करताना राष्ट्र निर्मितीचा वसा त्यांनी
घेतला होता. अशा व्यक्तींकडून प्रत्येकाने प्रेरणा घेतली पाहिजे, असे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे
म्हणाले.
इतिहास घडवायचा असेल तर त्याला कार्याची जोड आवश्यक असते.
मंचावरील प्रत्येक व्यक्तीचा येथे गौरव करण्यात आला. त्यांनी दुसऱ्यांची वाट न
पाहता आपल्या क्षेत्रात विशेष योगदान देऊन नवा इतिहास रचला. त्यामुळे त्यांचे
कार्य आणि व्यक्तिमत्त्व समाजासाठी प्रेरणादायी ठरले आहे. प्रत्येकांने अशा
व्यक्तींचा आदर्श बाळगून समाजासाठी काही तरी देणे आहे, ही जाणीव ठेवल्यास देशाच्या विकासाला मदत
मिळेल, असा सल्ला माजी न्यायमूर्ती विजय डागा यांनी दिला.
यावेळी
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते विदर्भ गौरव प्रतिष्ठानच्या ‘गौरव स्मरणिका’चे
विमोचन करण्यात आले.
कार्यक्रमात
नागरिक स्व. उमेश चौबे तसेच स्व. दुर्गादास रक्षक यांच्या परिवारासह माजी आमदार
यादवराव देवगडे, डॉ. मधुकर
वासनिक, श्रीपाद सहस्त्रभोजनी, अटल
बहादुर सिंह, सीमा साखरे, चित्रकार
अरुण मोटघरे, मेधनाथ बोधनकर, ज्येष्ठ
पत्रकार लक्ष्मणराव जोशी, बलदेवसिंग रेणू, रामभाऊ खांडवे, डॉ. हरिश कुलकर्णी, मदन गडकरी, कैलाश अग्रवाल, वामनराव गाणार, हास्य कवी
मधूर पांडे, केशवराव शेंडे, शेख मोहम्मद हाशीम, सत्यनारायण
शर्मा, वसंतराव डाखोळे, चंद्रकांत
ठक्कर, गणेश नायडू, ताराचंद खांडेकर,
पंडीत उमेश शर्मा, हरीभाई केदार, सलीम बेग अशा एकूण 55
व्यक्तींचा शाल, श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात
आला. कार्यक्रमाचे संचालन बाळ कुळकर्णी यांनी केले.
*****
No comments:
Post a Comment