नागपूर दि. 2 : राष्ट्रपिता महात्मा गांधी
यांच्या 150 व्या जयंतीदिनानिमित्त तसेच माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी महात्मा गांधी
व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
बचत भवन सभागृहात राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल
बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रकाश पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी रविंद्र
खजांजी, उपजिल्हाधिकारी रविंद्र कुंभारे, श्रीमती विजया बनकर, श्रीमती सुजाता
गंधे, जिल्हा पुरवठा अधिकारी भास्कर तायडे, प्रदिप कापसे आदि अधिकारी व
कर्मचाऱ्यांनी महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस गुलाब पुष्प
अर्पण करून अभिवादन केले.****


No comments:
Post a Comment