नवी दिल्ली दि. 2 : राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि
माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती
आज महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्रात साजरी करण्यात आली.
कोपर्निकस
मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त (अ.का.) समीर सहाय यांनी महात्मा
गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी सहायक निवासी आयुक्त सुमन चंद्रा, इशु संधु, अजितसिंह नेगी यांच्यासह
महाराष्ट्र सदन तसेच महाराष्ट्र परिचय केंद्राचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
उपस्थित अधिकारी कर्मचा-यांनीही यावेळी
प्रतिमेस पुष्प अर्पण करून
आदरांजली वाहिली.
00000
No comments:
Post a Comment