Monday, 1 October 2018

दिव्यांग, अनाथांच्या मागण्यांबाबत शासन संवेदनशील लवकरच व्यापक बैठक बोलाविणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि.1 :दिव्यांग आणि अनाथांच्या प्रलंबित मागण्यांबाबत शासन संवेदनशील असून, त्याबाबत लवकरच व्यापक बैठक बोलाविण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले.
दिव्यांग आणि अनाथांच्या विविध मागण्यांबाबत शिष्टमंडळाने मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांची सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे भेट घेतली. त्यावेळी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. आमदार बच्चू कडू यांनी या शिष्टमंडळाचे नेतृत्त्व केले.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, दिव्यांग आणि अनाथांच्या विविध मागण्यांबाबत तसेच त्यांच्यासाठीच्या निधीच्या विनीयोगाबाबत विविध मुद्दे समोर आले आहेत. दिव्यांग हक्क कायद्याची प्रभावी अमंलबजावणी व्हावी यासाठी प्रयत्नशील आहोत. अनाथांसाठी शिक्षण आणि नोकरीत एक टक्का आरक्षण देण्याचा महत्त्वपुर्ण निर्णयही यापुर्वी घेतला आहे. दिव्यांग आणि अनाथ घटकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी विविध विभागांचा समन्वय साधावा लागणार आहे. त्यादृष्टीने आगामी काळात एक व्यापक बैठक बोलाविण्यात येईल.
यावेळी बैठकीत दिव्यांग आयुक्तालय,कर्जमाफी, प्रवास सवलत, घरे, निधीचा विनियोग यांसह आरोग्य, शिक्षण आणि खेळाडुंसाठीच्या सुविधा याबाबत चर्चा झाली.
0000

No comments:

Post a Comment