Tuesday, 2 October 2018

स्वच्छता सेवा संदेश पदयात्रेच्या माध्यमातून महात्मा गांधीची तत्वे जनमाणसात रूजविण्याचा प्रयत्न -देवेंद्र फडणवीस




                                               
                                                *स्वच्छता सेवा संदेश पदयात्रेत उत्स्फूर्त प्रतिसाद
* तीन वर्षात 60 लक्ष शौचालयांची निर्मीती
* पाच किमीच्या पदयात्रेत मुख्यमंत्री  सहभागी.
          नागपूर दि 2 :- भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात सामान्य माणसाला जोडण्याचे महत्त्वपूर्ण कार्य   महात्मा गांधी यांनी  केले आहे. स्वच्छता, ग्रामविकास या क्षेत्रात काम करून नविन भारताचे मॉडेल गांधीजींनी दिले. महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त गांधीजींची तत्त्वे सामान्य जनतेपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.
 महात्मा गांधींच्या 150 व्या जयंतीनिमित्त स्वच्छता सेवा संदेश पदयात्रेत मुख्यमंत्री सहभागी झाले होते. यावेळी  पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर नंदाताई जिचकार, आमदार सुधाकर कोहळे, आमदार गिरीष व्यास, आमदार प्रा.अनिल सोले,  लघु उदयोग विकास मंडळाचे अध्यक्ष संदीप जोशी, लोकप्रतिनिधी,  नागरिक, महिलांनी पदयात्रेत मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, स्वच्छता हीच सेवा हा कार्यक्रम देशात मोठ्या प्रमाणावर  चालला असून गांधीजींच्या तत्वावरच  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात शासन कार्य करीत आहे. देशात स्वच्छता अभियान मोठ्या प्रमाणात यशस्वी झाले आहे. 1947 पासून 2014 पर्यंत राज्यात 50 लाख शौचालये होती. केवळ तीन वर्षात  राज्यात 60 लाख शौचालये बांधले. त्यामुळे राज्य हागणदारीमुक्त करून स्वच्छतेकडे अग्रेसरपणे वाटचाल करत आहे.

पदयात्रेच्या माध्यमातून स्वच्छतेचा संदेश पोहोचविण्याचा प्रयत्न सुरू आहे. ही पदयात्रा राज्यात वेगवेगळया गावात, शहरात व विविध टप्प्यात  सुरू राहील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पाच किलोमीटर  पायी चालून अभिवादन केले. ही पदयात्रा गजानननगर सभागृहापासुन सुरू झाली तिथून मार्गक्रमण करत-प्रियंकावाडी-रिंग रोड क्रॉस –छत्रपती हॉल –जनता हायस्कुल गल्ली- रिंग रोड प्रगती कॉलनी- तांबे हॉस्पीटल-वर्धा रोड-साई मंदिर-गजानन मंदीर-बौध्द विहार-देवनगर- नेहरूनगर-कसबेकर चौकातून- नरगुंदकर –राजयोग-वर्धा रोड-हल्दीराम-अमर एन्क्लेव्हा-वृंदावन–गजानननगर असे पाच किलोमीटर अंतराचे  मार्गक्रमण या पदयात्रेने पूर्ण केले.
या पदयात्रेत भजनी मंडळ, महात्मा गांधी यांच्या वेषातील कलावंत सर्जेराव जलपत आणि सॉफ्टवेयर इंजिनियर निशांत मिश्रा हे मुख्य आकर्षण होते. या भजन मंडळाने तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वैष्णव जन को हे भजन प्रस्तूत केले.
                                                                *******

No comments:

Post a Comment