नागपूर, दि.25 : नागपूर महानगरपालिका तसेच विभागीय आयुक्त यांच्या संयुक्त विद्यमाने कालीदास महोत्सव-2018 करिता शहरातील विविध भागातून अतिरिक्त बसेस सोडण्यात येणार आहेत.अतिरिक्त बसेसची व्यवस्था दिनांक 27 ते 29 नोव्हेंबर या कालावधीत उपलब्ध राहील.
रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित करण्यात येणाऱ्या कालीदास महोत्सवाचा नागपूरकरांना आनंद घेता यावा, यासाठी शहराच्या विविध भागातून अतिरिक्त बसेस सोडण्यात येणार आहेत. विभागीय आयुक्त संजीव कुमार व महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने चालविल्या जाणाऱ्या अतिरिक्त बसेस चिंचभुवन ते रेशीमबाग, डिफेन्स-बर्डी ते रेशीमबाग, स्वावलंबी नगर ते रेशीमबाग, पारडी ते रेशीमबाग, कळमेश्वर ते रेशीमबाग, हजारी पहाड ते रेशीमबाग, कोराडी ते रेशीमबाग, पिपळा फाटा ते रेशीमबाग, बेसा ते रेशीमबाग या 9 मार्गावर सोडण्यात येतील. याशिवाय नागरिकांच्या वतीने अन्य मार्गाची मागणी करण्यात आल्यास त्या मार्गावरुन देखील महानगरपालिकेच्या वतीने अतिरिक्त बसेस सोडण्यात येणार आहे.
*****
No comments:
Post a Comment