Monday, 26 November 2018

दिलखुलास कार्यक्रमात आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत

मुंबई, दि. 26 माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलासकार्यक्रमात सार्वजनिक आरोग्य  व कुटुंबकल्याण मंत्री डॉ. दीपक सावंत यांचीदृढनिश्चय... गोवर व रूबेला निर्मूलनाचाया विषयावर मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून मंगळवार दि. 27 आणि बुधवार दि. 28नोव्हेंबर रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे.  निवेदक नरेंद्र बेडेकर यांनी ही मुलाखत घेतली आहे.
       राज्यभरात  युध्द पातळीवर गोवर व रूबेला आजाराचे उच्चाटन करण्यासाठी लसीकरण मोहीमेची सुरूवात केली जात आहे. गोवर आणि रूबेला आजारांचे दुष्परिणामराज्यात या लसीकरण मोहीमेसाठी करण्यात आलेली तयारी आदी विषयी सविस्तर माहिती डॉ. सावंत यांनी 'दिलखुलासकार्यक्रमातून दिली आहे.
*****

No comments:

Post a Comment