Monday, 26 November 2018

‘शिक्षणाची वारी’ उद्यापासून मुंबईत

मुंबईदि. 26 :  विद्यार्थ्यांच्या विकासात शिक्षक-पालक दोघांचीही भूमिका महत्त्वाची आहे. शाळा व्यवस्थापन समिती ही मुख्यत्वेकरून पालकांचे प्रतिनिधित्व करते. शाळा व्यवस्थापन समिती हा घटक सक्षम झाल्यास शाळा विकासात लोकसमुदायाचा सहभाग अधिक वाढेल. त्यातून शिक्षक-पालक सुसंवाद निर्माण होईल आणि  १०० % विद्यार्थी प्रगत करण्यासाठी त्याचा उपयोग होईल. या उद्देशाने गुणवत्ता विकासासाठी शालेय व्यवस्थापन समित्यांचे सक्षमीकरण करण्यासाठी यावर्षीची शिक्षणाची वारी’ मुंबई येथे आयोजित केली आहे. मुंबईत एमएमआरडीए मैदानबीकेसीवान्द्रे पूर्व येथे २८ ते ३० नोव्हेंबर२०१८ या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे.
 ‘शिक्षणाची वारीचे यंदाचे चौथे वर्ष आहे. आतापर्यंत आयोजित केलेल्या शिक्षणाच्या वारीमध्ये सुमारे लाखभर शिक्षकपालक व शिक्षणप्रेमी नागरिकांनी विविध नाविन्यपूर्ण प्रयोगांचा लाभ घेतला आहे. यापूर्वी पुणेऔरंगाबादनागपूरअमरावतीनाशिक आणि  रत्नागिरी येथील यशस्वी आयोजनानंतर यावेळी मुंबईकोल्हापूरवर्धा,नांदेड आणि जळगाव येथे वारीचे आयोजन करण्यात आले आहे. या टप्प्यातील पहिली वारी मुंबईत एमएमआरडीए मैदानबीकेसीवान्द्रे पूर्व येथे दि. २८ ते ३० नोव्हेंबर,२०१८ या कालावधीत होत आहे. मुंबईच्या वारीत रायगडपालघरठाणेमुंबई उपनगर आणि मुंबई शहर या जिल्ह्यातील शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य व शिक्षक भेट देणार आहेत. दुपारी २ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत सर्व शिक्षणप्रेमींसाठी वारी खुली असणार आहे.
शाळा विकास आराखडा व शाळा व्यवस्थापन समिती संरचनापालकांची शाळांना अध्यापनात / कौशल्य विकासात मदतकिशोरवयीन आरोग्य शिक्षण,  शालेय पटसंख्येत भरीव वाढ होण्यासाठी राबविण्यात आलेले उपक्रम,  लोकसहभागशालेय पोषण आहार,  स्थलांतरित व शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी समितीचा सहभागस्वच्छ भारत-स्वच्छ विद्यालयदिव्यांग मुलांसाठीचे शिक्षणगणित व भाषा वाचन विकासकृतियुक्त विज्ञान,  तंत्रज्ञानाचा अध्यापनात प्रभावी वापर,कलाकार्यानुभव व  क्रीडा विषयक उपक्रमांचे प्रयोग येथे मांडण्यात आले आहेत.
या शैक्षणिक प्रयोगांची सर्वांना माहिती व्हावी. शिक्षक व शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांना या प्रयोगांचा अंगिकार करता यावा. अनुभव घेता यावा हा या वारीच्या आयोजनामागील प्रमुख उद्दिष्ट आहे. या टप्प्यातील दुसरी वारी कोल्हापूर (१० ते १२ डिसेंबर२०१८)तिसरी वारी वर्धा ( ३ ते ६ जानेवारी२०१९)चौथी वारी नांदेड येथे (२९ ते ३१ जानेवारी२०१९) आणि पाचवी वारी जळगाव येथे (१५ ते १७ फेब्रुवारी२०१९) होणार आहे.
0 0 0

No comments:

Post a Comment