Tuesday, 27 November 2018

'जय महाराष्ट्र'कार्यक्रमात खासदार अमर साबळे यांची मुलाखत 'संविधान सप्ताह विशेष कार्यक्रम'


    मुंबई, दि. 27 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात खासदार अमर साबळे यांची यांचा भारताचे संविधान' या विषयावर  विशेष कार्यक्रम दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून  बुधवार दि. २८ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ७.३० ते ८.०० या वेळेत प्रसारित होणार आहे. या कार्यक्रमाचे निवेदन नरेंद्र बेडेकर यांनी केले आहे.
राज्य शासनातर्फे राज्यात २६ नोव्हेंबर ते २ डिसेंबर २०१८ या कालावधीत संविधान सप्ताह साजरा केला जात आहे. जगातील सर्वश्रेष्ठ संविधान म्हणून भारताची असलेली ओळख, संविधान सप्ताहाचे महत्व,घटनेने दिलेल्या अधिकारांबद्दल प्रत्येकाने कशा प्रकारे जागरूक राहून संवेदनशील असले पाहिजे,राज्यघटनेतील तत्वांची सर्वांना माहिती होण्यासाठी कशा प्रकारे प्रयत्न व्हायला पाहिजेत याबाबत सविस्तर माहिती खासदार अमर साबळे यांनी 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमातून दिली आहे.
*****

No comments:

Post a Comment