मुंबई, दि. 27 : राज्यातील केंद्रीय
आश्रमशाळांना अनुदान देण्याविषयी शासन सकारात्मक आहे. अनुदान देण्यासंदर्भातील
प्रश्न हा डिसेंबरअखेरपर्यंत निकाली निघेल, असे सामाजिक
न्याय व विशेष सहाय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी विधानपरिषदेत अल्पकालीन
चर्चेला उत्तर देताना सांगितले.
विधानपरिषद नियम 92 अन्वये सदस्य सतीश चव्हाण
यांनी राज्यातील अनुदानास पात्र शाळांना अनुदान देण्याविषयीची चर्चा उपस्थित केली
होती. यास उत्तर देताना श्री. कांबळे बोलत होते.
गोरगरीब,
मागास विद्यार्थ्यासाठी केंद्रीय आश्रमशाळा कार्यरत आहेत. त्यामुळे
या आश्रमशाळांच्या अनुदान देण्याविषयी शासन सकारात्मक असल्याचे श्री. कांबळे यांनी
यावेळी सांगितले. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री नागो गाणार, भाई गिरकर, विक्रम काळे यांनी भाग घेतला.
००००
No comments:
Post a Comment