मुंबई, दि. 26 : मुंबईतील वांद्रे (पश्चिम) येथील नर्गिस दत्तनगर झोपडपट्टीचे सर्वेक्षण करुन बेकायदा व विनापरवाना राहणाऱ्या नागरिकांची चौकशी करुन योग्य ती कारवाई केली जाईल, असे नगरविकास राज्यमंत्री डॉ.रणजित पाटील यांनी सांगितले.
यासंदर्भातली लक्षवेधी सूचना सदस्य हेमंत टकले यांनी मांडली होती.
यावेळी डॉ.पाटील म्हणाले, नर्गिस दत्तनगर झोपडपट्टीत 30 ऑक्टोबर 2018 रोजीची आग सदोष विद्युत प्रणालीमुळे लागली असल्याचे बृहन्मुंबई महानगरपालिकेने कळविले आहे. स्थानिक पोलीसांमार्फत करण्यात आलेल्या चौकशीत, नर्गिस दत्तनगर झोपडपट्टीमध्ये विनापरवाना बेकायदेशीर वास्तव्य करुन घुसखोर बांगलादेशी नागरिक राहत नसल्याचे पोलीसांना आढळून आले आहे. सदर झोपडपट्टीमधील अनधिकृत माळे, झोपडपट्टी लगतचे रस्ते व पदपथावरील अनधिकृत झोपडपट्यांवर बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत वेळोवेळी कारवाई करण्यात येते. सदर आगीमध्ये बाधीत झालेल्या 204 कुटुंबांना प्रतिकुटुंब 5 हजार रुपये इतके सानुग्रह अनुदानाचे वाटप जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर यांचेमार्फत करण्यात आलेले आहे.
यावेळीच्या चर्चेत सदस्य भाई जगताप सहभागी होते.
000
No comments:
Post a Comment