Thursday, 3 January 2019

विभागीय लोकशाही दिन महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी


नागपूर, दि. 3 :  विभागीय आयुक्त  डॉ. संजीव कुमार यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार, दिनांक 14 जानेवारी 2019 (महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी) रोजी  विभागीय लोकशाही दिन आयोजित करण्यात आला आहे. यावेळी विभागीय आयुक्त जनतेच्या तक्रारी व गाऱ्हाणी ऐकतील.
तक्रारकर्त्यांनी जिल्हास्तरावरील लोकशाही दिनात दिलेल्या निवेदनाची प्रत, लोकशाही दिनाच्या टोकनाची प्रत तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मिळालेल्या उत्तराची प्रत या सर्व प्रतींचे स्वतंत्र दोन संच  घेऊन सकाळी  11 ते 1  वाजेपर्यंत स्वत: उपस्थित रहावे, असे आवाहन  उपायुक्त (सामान्य प्रशासन) संजय धिवरे यांनी केले आहे.
***** 

No comments:

Post a Comment