नागपूर, दि.08 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत
जिल्हा समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद, नागपूर मार्फत दिव्यांग व्यक्तींकरिता
विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात.
त्यामध्ये शिक्षण घेणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांना शालांतपूर्व तसेच शालांतपरीक्षेत्तेर दिव्यांग शिष्यवृत्ती, स्वयंरोजगारासाठी बिज-भांडवल योजना, दिव्यांग-अव्यंग विवाहीत
जोडप्यांना अर्थसहाय्य देणे, दिव्यांग-दिव्यांग विवाहीत जोडण्यास अर्थसहाय्य देणे,
दिव्यांग विद्यार्थ्यांना संगणक प्रशिक्षण फी माफी देणे तसेच कमरेपासून खाली
अपंगत्व असलेल्या अस्थिव्यंग व्यक्तीला तीनचाकी
सायकल पुरविणे या योजना राबविण्यात येतात.
नागपूर
जिल्ह्यातील 10 वी उत्तीर्ण दिव्यांग व्यक्तीने शासनमान्य संस्थेमधून संगणक प्रशिक्षण केल्यास किंवा संगणक प्रशिक्षण सुरु असल्यास त्यांना फी माफी चा लाभ
देण्यात येईल. त्या अनुषंगाने दिव्यांग
व्यक्तींने सदर योजनेचा लाभ घेणेसाठी चौकशी करावयाची असल्यास कार्यालयीन वेळेत
जिल्हा समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद, नागपूर येथे संपर्क साधावा असे आवाहन
सुकेशिनी तेलगोटे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी , जिल्हा परिषद, नागपूर यांनी केले
आहे.
****
No comments:
Post a Comment