Tuesday, 8 January 2019

सामाजिक न्याय विभागाच्या सचिवांनी घेतला कामाचा आढावा


प्र. प. क्र.  36                                                      दिनांक 08 जानेवारी  2019

 नागपूर, दि.08  :  सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे यांनी सामाजिक न्याय भवन येथे नागपूर- अमरावती सामाजिक न्याय विभागाचा आढावा घेतला.
            शिष्यवृत्ती, रमाई घरकुल, सबळीकरण योजना, मिनी ट्रॅक्टर योजना, स्वाधार योजना, समाज कल्याण विभागांतर्गत बांधण्यात येत असलेले सामाजिक न्याय भवन, शासकीय वसतिगृहे, निवासी शाळा, दुरुस्तीचे कामे, 125 वी जयंती ऐतिहासिक स्थळे, ऐतिहासिक स्थळांना देण्यात आलेले अनुदान या सर्व बांधकामाचा आढावा तसेच ग्रामीण अनुसूचित जाती नवबौद्ध वस्ती विकास (दलित वस्ती योजना), अण्णा भाऊ साठे नागरी वस्ती योजना, त्याचप्रमाणे या सर्व योजनांसाठी करण्यात येणाऱ्या खर्चाचा आढावा इ. विषयावर तपशीलवार आढावा घेण्यात आला.
शिष्यवृत्ती योजनेंतर्गत महाडिबीटी पोर्टलवर महाविद्यालयीन स्तरावरील प्रलंबित अर्ज सहाय्यक आयुक्त कार्यालयाचे स्तरावर सादर करण्याबाबतची सूचना सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्यांना करण्यात आली.  सहाय्यक आयुक्तांनी त्यांचे स्तरावर अप्राप्त सर्व महाविद्यालयांचे अर्ज त्वरीत निकाली काढण्यात यावी तसेच इतरही लोकाभिमुख महत्त्वाच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करुन शासनाकडून प्राप्त तरतूद शंभर टक्के खर्च करण्याच्या सूचना प्रधान सचिवांनी सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी आयुक्त समाज कल्याण, पुणे तसेच अमरावती व नागपूर विभागातील प्रादेशिक उपायुक्त तसेच त्यांचे जिल्हा स्तरावरील क्षेत्रिय अधिकारी उपस्थित होते.
                                                     *****   

No comments:

Post a Comment