मुंबई, दि. 4
: राज्य गृहरक्षक दलाच्या (होमगार्ड) वतीने 11
फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारी दरम्यान नवीन होमगार्ड
सदस्यांच्या नोंदणीस सुरूवात होणार आहे. घाटकोपर येथील लोहमार्ग आयुक्तालयाच्या
आवारात सकाळी 7 ते सायंकाळी 5 या
कालावधीत ही नोंदणी मोहीम होणार आहे. होमगार्डसाठी जास्तीत जास्त युवकांनी नोंदणी
करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
या नोंदणीसाठी
उमेदवाराची पात्रता पुढील प्रमाणे – उमेदवार कमीत कमी 10 वी पास असावा, वय 20 ते 50 वर्षे, पुरुषांसाठी उंची 162
सेंमी. छाती न फुगविता कमीत कमी 76 सेंमी व 5 सेंमी फुगली पाहिजे, धावणे चाचणी 1600 मीटर. महिलांसाठी उंची 150 सेंमी व 800 मीटर धावणे. बृहन्मुंबई, ठाणे व रायगड जिल्ह्यातील
वैद्यकीय दृष्ट्या उमेदवार यासाठी नोंदणी करू शकतात. उमेदवाराने येताना सोबत पासपोर्ट
आकाराची चार छायाचित्रे आणावीत, असे होमगार्ड विभागाने प्रसिध्दी पत्रकान्वये
कळविले आहे.
००००
No comments:
Post a Comment