Monday, 4 February 2019

‘जय महाराष्ट्र’ मध्ये 'आर्थिक गुन्हेगारी रोखण्यासाठी एमपीआयडी कायदा' विषयावर मुलाखत

         मुंबई, दि.४ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित जय महाराष्ट्रकार्यक्रमात गृहविभागाचे प्रधान सचिव (विशेष) अमिताभ गुप्ता, राज्य आर्थिक गुन्हे विभागाचे अपर पोलीस महासंचालक प्रभात कुमार, मुंबई आर्थिक गुन्हे शाखा मुंबईचे सह पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांची 'आर्थिक गुन्हेगारी रोखण्यासाठी एमपीआयडी कायदा' या विषयावर मुलाखत घेण्यात आली आहे.
ही मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून मंगळवार दि. ५ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ७.३० ते ८ या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदक राजेंद्र हुंजे यांनी ही मुलाखत घेतली आहे.        
महाराष्ट्रातील आर्थिक गुन्ह्यांची सद्य:स्थिती, एमपीआयडी कायदा व या कायद्यात सद्यस्थितीत केलेल्या सुधारणा, महाराष्ट्रात खासगी ठिकाणी गुंतवणूक करत असताना नागरिकांनी घ्यावयाची खबरदारी, गुंतवणूकदारांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजना याबाबतची सविस्तर माहिती श्री. गुप्ता, श्री. कुमार, श्री. चौबे यांनी जय महाराष्ट्रकार्यक्रमात दिली आहे.
000

No comments:

Post a Comment