Saturday, 2 February 2019

शैक्षणिक सत्र 2018-19 मधील शिष्यवृत्तीचे अर्ज स्वीकारण्यास 15फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

                                                           
नागपूर, दि2: सामाजिक न्याय व विशेष विभागामार्फत मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शालेय शिष्यवृत्ती योजनांच्या माध्यमातून आर्थिक लाभ दिला जातो.  शैक्षणिक सत्र 2018-19 मधील सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना, शिक्षण फी-परीक्षा, फी- प्रतीपूर्ती योजना आणि माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना गुणवत्ता शिष्यवृत्तीचे अर्ज ऑफलाईन मॅन्युअल पध्दतीने स्वीकारण्याबाबत 15 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
त्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व अनुदानित/विनाअनुदानित/कायम विनाअनुदानित शाळांच्या मुख्याध्यापकांनी पात्र विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्जाचे विहित नमुन्यातील परीपूर्ण प्रस्ताव 31 जानेवारी 2019 पर्यंत बँक खात्यास आधार संलग्न केलेल्या पावत्यांसह जिल्हा समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद, नागपूर  कार्यालयाकडू सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.  परंतु अद्यापही बऱ्याच शाळांनी प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या जिल्हा समाज कल्याण शाखेकडे सादर केला नसल्यामुळे  शिष्यवृत्ती योजनेचे अर्ज स्वीकारण्यास 15 फेब्रुवारी 2019 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.   तरी संबंधित शाळांनी  15 फेब्रुवारी 2019 पर्यंत शिष्यवृत्तीचे अर्ज सादर करावे,  असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुकेशिनी तेलगोटे यांनी केले आहे.
** * * * **

No comments:

Post a Comment