Monday, 4 February 2019

‘प्लास्टिक बंदीचे शिवधनुष्य’ पुस्तकाचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते आज प्रकाशन


           मुंबई, दि. 4 : पर्यावरण विभाग व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे उद्या मंगळवार दि. 5 फेब्रुवारी रोजी प्लास्टिक बंदीचे शिवधनुष्यया पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या उपस्थितीत होणार आहे.
            हा कार्यक्रम यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, नरिमन पॉईंट येथे सायंकाळी 5.30 वाजता होणार असून उद्योग मंत्री सुभाष देसाई, परिवहन मंत्री दिवाकर रावते, पर्यावरण राज्यमंत्री प्रवीण पोटे-पाटील, प्रदुषण मंडळाचे अध्यक्ष सुधीर श्रीवास्तव, प्रधान सचिव अनिल डिग्गिकर, सदस्य सचिव ई रविंद्रन, शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे आणि सिने अभिनेत्री जुही चावला उपस्थित राहणार आहेत.
००००

No comments:

Post a Comment