नागपूर, दि. 11 : विभागीय लोकशाही दिनात आज नागरिकांकडून तीन तक्रारी स्वीकारण्यात आल्या. उपायुक्त के.एन.के.राव यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभाकक्षात विभागीय लोकशाही दिन घेण्यात
आला. प्राप्त झालेल्या तक्रारींमध्ये जिल्हाधिकारी
कार्यालय, चंद्रपूर -1 तसेच जिल्हाधिकारी कार्यालय, नागपूर -1 यावेळी नवीन 1 तसेच जुन्या 11 तक्रारींवर चर्चा करण्यात आली.
या लोकशाही दिनाला
विशेष पोलीस महानिरीक्षक, नागपूर परीक्षेत्र, नागपूर सुधार प्रन्यास, महानगरपालिका, जिल्हाधिकारी, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), महावितरण विभाग, विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था, कामगार आयुक्त कार्यालय, भूमी अभिलेख कार्यालय, जिल्हा परिषद तसेच इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते. *****
No comments:
Post a Comment