Friday, 22 February 2019

पोलिस भरती प्रक्रियेत बदल लेखी परीक्षेनंतर मैदानी चाचणी

नागपूर, दि.22 :  राज्य राखीव पोलिस बलाने पोलिस शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेतील शारीरिक चाचणी दरम्यान होणाऱ्या दुर्घटना लक्षात घेऊन भरती प्रक्रियेत बदल केलेला आहे.
नवीन पद्धतीनुसार पोलिस शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत उमेदवारांची लेखी परीक्षा प्रथम घेण्यात येणार आहे. लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांपैकी पोलिस घटक कार्यालयाच्या रिक्त होणाऱ्या पदांच्या प्रमाणात आवश्यक तेवढयात योग्य उमेदवारांना शारीरिक चाचणीसाठी बोलविण्यात येणार आहे. भरती प्रक्रियेत केलेल्या बदलांचा फायदा उमेदवारांना निश्चितच होईल, अशी माहिती राज्य राखीव पोलिस बल गट क्रं. 4 चे समादेशक प्रणय अशोक यांनी दिली.     
******

No comments:

Post a Comment