मुंबई, दि. 5 :
कुपरेज-ओव्हल मैदान (कुलाबा) येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या
पुतळ्यासमोर भव्य राष्ट्रीय तिरंगा ध्वज व अखंड भीमज्योत उभारणार असल्याची माहिती
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी दिली.
कुपरेज-ओव्हल मैदान (कुलाबा)
येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर भव्य राष्ट्रीय तिरंगा
ध्वज व अखंड भीमज्योत उभारण्याबाबत मंत्रालयात आयोजित बैठकीत श्री.बडोले बोलत
होते. यावेळी आमदार भाई गिरकर, राज पुरोहित, सामाजिक न्याय
व मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते.
याविषयी श्री. बडोले म्हणाले, कुपरेज-ओव्हल
मैदानावरील भव्य राष्ट्रीय तिरंगा ध्वज व अखंड भीमज्योत उभारण्याबाबतचा सर्व खर्च
सामाजिक न्याय विभाग करेल व राष्ट्रीय तिरंगा ध्वज व भीमज्योतीची देखभाल मुंबई
महानगरपालिका करेल. हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचनाही संबंधितांना
यावेळी देण्यात आल्या.
००००


No comments:
Post a Comment