मुंबई,दि. 5 : माहिती
व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात व्यवसाय कर विभागाचे राज्यकर सहआयुक्त डॉ. डेव्हीड अल्वारीस
यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व
केंद्रावरून बुधवार दि. 6 आणि गुरुवार दि. 7 फेब्रुवारी २०१९ रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या
वेळेत प्रसारित होईल. निवेदक सुरेश ठमके यांनी ही मुलाखत घेतली आहे.
राज्य शासनाच्या व्यवसाय कर
विभागातर्फे १४ जानेवारी ते ८ फेब्रुवारी या कालावधीत व्यवसाय कर विशेष नोंदणी
अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचा उद्देश, अभियानांतर्गत कोणते उपक्रम
हाती घेण्यात आले आहेत, व्यवसाय कर भरण्याचे फायदे, अभियानाला आतापर्यंत मिळालेला प्रतिसाद, सध्याची
व्यवसायकराची रचना, व्यवसाय कर कोणाला भरावा लागतो आदी
विषयांची माहिती श्री. अल्वारीस यांनी ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून दिली आहे.
००००
No comments:
Post a Comment