ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन
नागपूर, दि.22 : बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009च्या कलम
12 (1)सी नुसार वंचित व दुर्बल घटकातील बालकांसाठी राखीव प्रवेशांतर्गत 25 टक्के
राखीव जागांसाठी शैक्षणिक सत्र 2019-20 साठी यापूर्वी पाहीर करण्यात आलेल्या वेळापत्रकात बदल
करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी चिंतामण
वंजारी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.
त्यामध्ये आरटीई प्रवेशपात्र
शाळांचे आणि नवीन शाळांची नोंदणी केलेल्या शाळांचे गटशिक्षणाधिकारी यांच्याकडून 4
मार्चपर्यंत तपासणी करण्यात येत आहे. ही तपासणी 8 फेब्रुवारीपासून सुरु झालेली आहे. त्यामुळे पालकांनी आपल्या
पाल्यांचे ऑनलाईन अर्ज दि. 5 मार्च ते 22 मार्चदरम्यान सादर करावेत. त्यामुळे ऑनलाईन
अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. या मुदतवाढीची पालकांनी नोंद
घ्यावी, असे आवाहन प्राथमिक शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे
केले आहे.
******
No comments:
Post a Comment