नागपूर, दि. 7 : मतदारांना मतदार यादीसंदर्भात माहिती
देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात मतदार
हेल्पलाईनची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. मतदारांनी जिल्हा संपर्क
केंद्रात 1950 या टोलफ्री क्रमांकावर आतापर्यंत सहाशेपेक्षा जास्त कॉल करुन मतदार
यादीसंदर्भात माहिती घेतली असून त्यांना समाधानकारक उत्तरे देण्यात आली आहेत.
जिल्हाधिकारी
तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा संपर्क केंद्रात
हेल्पलाईन व स्वतंत्र कक्ष सुरु करण्यात आले आहे. जनतेच्या सुविधेसाठी हा
उपक्रम 25 जानेवारीपासून सुरु करण्यात आला
आहे. आजपर्यंत या हेल्पलाईवर सहाशेपेक्षा जास्त नागरिकांनी कॉल केले आहेत.
निवडणूक
आयोगाच्या सूचनेनुसार नागरिकांना, मतदारांना मतदार यादीत नाव नोंदणी तसेच मतदान
प्रक्रियेची माहिती सहजरित्या उपलब्ध होण्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हा संपर्क
केंद्र सुरु करण्यात आले आहे. नागपूरचे हे केंद्र जिल्हाधिकारी कार्यालयात सुरु
असून निवडणुकीसंदर्भातील संपूर्ण माहिती या केंद्रात उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न
प्रशासनाचा आहे. या जिल्हा संपर्क केंद्रात कॉल करण्याकरिता 1950 हा टोलफ्री
क्रमांक उपलब्ध आहे.
मतदान
प्रक्रिया तसेच मतदार यादीत नाव नोंदविणे, नाव शोधणे, नवीन अर्ज करणे, नावात
दुरुस्ती करणे, नाव मतदार यादीतून वगळणे याबाबतची माहिती नागरिकांना फक्त एका
कॉलवर सहज उपलब्ध करुन देण्यात आली आहे. नागरिकांना विशेष सुविधाम्हणून सुद्धा
महानगरपालिकेच्या सर्व झोन अंतगर्त कीऑक्स यावरसुद्धा माहिती उपलब्ध करुन देण्यात
आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिली.
****
No comments:
Post a Comment