मुंबई,दि.22:- माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ‘टंचाईवर मात’ या विषयावर मुलाखत प्रसारित होणार आहे. महसूल, मदत व पुनर्वसन, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), कृषी व फलोत्पादन मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची ही विशेष मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून सोमवार दि. 25 आणि मंगळवार दि. 26 फेब्रुवारी रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल.
राज्यात दुष्काळ निवारणासाठी शासनाने केलेल्या उपाययोजना, दुष्काळी गाव निवड,केंद्राच्या निकषामध्ये न बसणा-या दुष्काळी गावांना राज्य शासन कशा प्रकारे मदत करत आहे, चारा छावणीबद्दल शासनाची भूमिका, जिल्हयांना देण्यात आलेल्या सूचना, पाणी टंचाई असणा-या गावात बसविलेल्या पाण्याच्या टाक्या, दुष्काळग्रस्त गावांसाठी शासनाची मदत वाटपाचे नियोजनासंदर्भात सविस्तर माहिती श्री. पाटील यांनी ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून दिली आहे.
0000

No comments:
Post a Comment