Saturday, 23 February 2019

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा आज औपचारिक शुभारंभ

        नागपूर दि. 23 : शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरीता केंद्रशासनाने सुरु केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा औपचारिक शुभारंभ उद्या रविवार दिनांक 24 फेब्रुवारीला सकाळी 10 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बचत भवन येथे आयोजित करण्यात आला आहे.
            प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या जिल्हास्तरीय उद्घाटन समारंभात या योजनेची माहिती सकाळी 10 वाजता देण्यात येईल. सकाळी 11.30 वाजता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मन की बात कार्यक्रमाचे प्रसारण व त्यानंतर गोरखपूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय योजनेच्या शुभारंभाचे थेट प्रसारण होईल या कार्यक्रमास उपस्थित राहाण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी केले आहे.
                                            ****

No comments:

Post a Comment