मुंबई, दि. ७ : माहिती व जनसंपर्क
महासंचालनालय निर्मित 'जय
महाराष्ट्र' कार्यक्रमात परिवहन, खारभूमी विकास मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष
दिवाकर रावते यांची 'सुखकर प्रवास, दर्जेदार सेवा' या
विषयावर विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री
वाहिनीवरून शुक्रवार दि. ८ मार्च रोजी सायंकाळी ७.३०
वाजता प्रसारित होणार आहे. निवेदिका मनाली दीक्षीत यांनी ही मुलाखत घेतली आहे.
एसटी बसमध्ये महिला चालकाची नियुक्ती, महिलांकरिता अबोली रिक्षा योजना, एसटी महामंडळाने दुष्काळी भागासाठी तसेच इतर भागासाठी सुरू केलेली पदभरती, दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांना पास सवलत, शिवशाही बसमध्ये ज्येष्ठ नागरिकांना सवलत, राज्यातील एसटीची बसस्थानके आधुनिक करण्यासाठी हाती
घेण्यात आलेली मोहीम, प्रवाशांना एसटीकडे आकर्षित
करण्यासाठी राबविण्यात येणा-या कल्पक योजना, पंढरपूर येथे एसटी महामंडळाच्या वतीने उभारले जाणारे भक्तनिवास, भक्तनिवासातील सोयी-सुविधा, वारक-यांसाठी राज्यभरात सुरू करण्यात आलेली विशेष बससेवा आदी विषयांची
सविस्तर माहिती श्री. रावते यांनी ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून दिली आहे.
००००

No comments:
Post a Comment