Thursday, 7 March 2019

दिलखुलास मध्ये अन्न व औषध प्रशासन आयुक्त डॉ. पल्लवी दराडे


महिला दिनानिमित्त विशेष मुलाखत

मुंबई, दि. 7 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित दिलखुलास कार्यक्रमात महिला दिनानिमित्त अन्न व औषध प्रशासन आयुक्त डॉ. पल्लवी दराडे यांची विशेष मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून शुक्रवार दि. ८ मार्च रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदिका मनाली दीक्षित यांनी ही मुलाखत घेतली आहे.
मार्च हा दिन जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. अनेक क्षेत्रात महिला आज आपलं कर्तृत्व सिद्ध करीत आहेत. राज्यातील प्रशासनातही अनेक महिला कार्यरत आहेत. राज्यातील प्रशासनात कार्यरत असलेल्या या कर्तृत्ववान महिलांपैकी एक म्हणजे राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्त पल्लवी दराडे आहेत. आतापर्यंतचा शैक्षणिक प्रवास, विक्रीकर विभागातील तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेतील काम करीत असतानाचा अनुभव, नागपुरात कार्यरत असतानानाचा अनुभव, युवतींना या कार्यक्रमाच्या माध्यमातून मार्गदर्शनपर दिलेला संदेश, जागतिक महिला दिनानिमित्त केलेले आवाहन आदी माहिती श्रीमती दराडे यांनी दिलखुलास कार्यक्रमातून दिली आहे.
००००

No comments:

Post a Comment